top of page

मसाप ब्लॉग  

'कवितांच्या प्रतिमांची कालानुरूप चिकित्सा करावी लागते : डॉ. नीलिमा गुंडी' 'मसाप मध्ये,

पुणे : दुर्गा ही भारतीय मनात रुजलेली एक सांस्कृतिक प्रतिमा आहे. संस्कृतीच्या वाटचालीत


समूहमनाला आधार देण्यासाठी प्रतिमांची निर्मिती घडत असते या प्रतिमांमधला आशय महत्वाचा असतो. अतिशय कठीण असे उद्धिष्ट जिने स्वबळावर कठोर साधनेच्या साहाय्याने प्राप्त केले. ती शक्ती म्हणजे दुर्गा आज सर्व स्त्रियांसाठी स्त्रीपुरुष समता, स्वातंत्र्य आणि न्याय प्राप्त करणे, हे उद्धिष्ट आपल्यासमोर आहे, या उध्दिष्टापर्यंतचा प्रवास खडतरच आहे. त्यासाठी आत्मबळ मिळवायला या प्रतिमेकडून प्रेरणा मिळू शकते. प्रतिमांची कालानुरूप चिकित्साही करावी लागते. आवश्यकतेनुसार त्यांना नवा अर्थही द्यावा लागतो. जसे की दुर्गा आणि आजची निर्भया या प्रतिमांमध्ये काही दुवे असू शकतात. परंपरेशी असे डोळसपणे स्वीकार नकाराचे नाते ठेवून आज काही कवयित्री कविता लिहीत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे, असे मत कविसंमेलच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा गुंडी यांनी व्यक्त केले. कवयित्री आसावरी काकडे प्रमुख पाहुण्या होत्या.

स्त्रीच्या जीवनसंघर्षाच्या रेषा छोट्या असतात. वेदना, संघर्ष जीवघेण्या कसोट्यांचे क्षण मोठी बातमी न होणारे आयुष्य, तादात्म्याने जगणे ही तिची सर्जनशील प्रक्रिया आहे. स्त्रीची उमेद, संघर्ष मला मोलाचे वाटतात. स्त्री म्हणजे अशा उदाहरणांची छोटी छोटी दुर्गा रूपं आहेत. ही दुर्गा रूपं समाजाचे स्वस्थ टिकवून ठेवतात असे प्रतिपादन आसावरी काकडे यांनी केले.


महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि साहित्यदीप प्रतिष्ठान, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्र महोत्सवानिमित्त स्त्रीशक्ती, स्त्रीजाणिवा आणि स्त्रीमुक्तीच्या कवितांचा जागर 'कविता दुर्गेच्या' - (तीन पिढ्यांच्या) या कवयित्रींच्या संमेलनात डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, अंजली कुलकर्णी, डॉ. संगीता बर्वे, ज्योत्स्ना चांदगुडे, संजीवनी बोकील, प्रभा सोनावणे, मीरा शिंदे, स्वाती सामक, अनुराधा काळे, प्रतिभा पवार, मृणालिनी कानिटकर, आश्लेषा महाजन, कल्पना दुधाळ, वैशाली मोहिते, सुनीती लिमये, भाग्यश्री देसाई, मीरा शिरसमकर, वृषाली वाजनिरकर, भक्ती लाळे, हर्षदा सौरभ, ऋचा कर्वे, बालिका ज्ञानदेव, तनुजा चव्हाण, मीनाक्षी नवले, सुजाता पवार या कवयित्रींचा सहभाग होता. कविता दुर्गेच्या या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन मृणालिनी कानिटकर आणि ज्योत्स्ना चांदगुडे यांनी केले, यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, ज्येष्ठ कवी अनिल कांबळे, धनंजय तडवळकर उपस्थित होते. प्रमोद आडकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.


Featured Posts
Recent Posts
Archive