"मसाप आणि मैत्र युवा फौंडेशनतर्फे वंचित मुलांसाठी अक्षरदिवाळी"
पुणे :- महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मैत्र युवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०१६ रोजी ११. १५ वा. वंचित मुलांसाठी 'अक्षर दिवाळी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वंचित मुलांना वाचनप्रवृत्त करण्यासाठी पुस्तकाच्या रूपाने मसापतर्फे अक्षरफराळ प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते दिला जाणार आहे. हा समारंभ मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. या समारंभाला मैत्र युवा फौंडेशनचे संकेत देशपांडे, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत.