मसाप ब्लॉग  

आनंद यादव यांचे पुण्यात निधन... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

November 28, 2016

 डॉ आनंद यादव यांच्या निधनाने ग्रामीण साहित्य चळवळीचा आधारवड कोसळला . शहरात राहून कल्पनेने ग्रामीण जीवनाचे चित्रण  मराठी साहित्यात  अनेक वर्षे केले जात होते ते एक तर तुच्छतेच्या अंगाने किंवा विनोदी ढंगाने केले जात होते त्याला छेद देत डॉ आनंद यादव यांनी अस्सल ग्रामीण संवेदना आणि वेदना आपल्या साहित्यातून प्रभावीपणे मांडली .सर्जनशील साहित्यिक म्हणून डॉ यादव यांचे योगदान जितके मोलाचे आहे तितकेच ग्रामीण साहित्य चळवळीतला क्रुतीशील कार्यकर्ता म्हणूनही त्यांचे काम लक्षणीय आहे.अनेक साहित्यिकाना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले .लोकशाही मार्गाने निवडून येवूनही त्यांना महाबलेश्वर येथे झालेल्या साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद भूषविता आले नाही याची कायम मनात खंत राहील.त्या वेळी यातून मार्ग निघावा यासाठी साहित्य परिषद आणि व्यक्तिश : मी प्रयत्न केले होते पण यश आले नाही डॉ  यादव मसापचे उपाध्यक्ष होते त्यांचे मार्गदर्शन  आणि स्नेह परिषदेला नेहमीच मिळाला त्यांच्या निधनाने परिषदेची मोठी हानी झाली आहे.

                                        -प्रा मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive
Please reload

Search By Tags