© म.सा.प., पुणे 

Maharashtra Geet - Marathi
00:00 / 00:00
  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • YouTube Social  Icon

Total visitors: 

Website Designed & Developed By: 

सक्षम लेखक, सजग वाचक

एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक

यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ 

www.sahityasetu.org

मसाप ब्लॉग  

'मसापने साजरा केला माधवराव पटवर्धन सभागृहाचा अमृतमहोत्सव'

November 30, 2016

२९ नोव्हेंबरला विशेष कार्यक्रम ; साहित्यप्रेमींचा स्नेहमेळावा रंगला

पुणे : महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या आणि शतकोत्तर दशकपूर्तीकडे वाटचाल    करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वैभव म्हणजे परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह. अनेक दिग्गजांच्या भाषणांचे, संमेलनाध्यक्षांच्या विचारांचे, नामवंत कवींच्या काव्यवाचनाचे, पुस्तक प्रकाशन सोहळयाचे आणि वाङ्मयीन वाद-चर्चेचे साक्षीदार असलेल्या माधवराव पटवर्धन सभागृहाची कोनशिला २९ नोव्हेंबर १९४१ रोजी साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या हस्ते बसविण्यात आली. त्याला यंदा ७५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मसापतर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पटवर्धन सभागृहात झालेल्या विशेष समारंभासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  या समारंभास ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, मसापचे पूर्वाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी, प्रा. द. मा. मिरासदार आणि डॉ. प्र. चिं. शेजवलकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते.