नवोदित कवींसाठी सुहासिनी इर्लेकर पुरस्कार २०१७
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे तर्फे, कै. सुहासिनी इर्लेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, नवोदित कवीच्या पहिल्या कवितासंग्रहाला, दरवर्षी एक विशेष पुरस्कार दिला जातो. कवीच्या पहिल्याच २०१६ या वर्षात प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रहाचा, या पुरस्कारासाठी विचार केला जाईल. आपला हा पहिलाच प्रकाशित कवितासंग्रह असल्याचे प्रतिज्ञापत्र, कवींनी कवितासंग्रहासहित पाठवावे. यासाठी कवी / प्रकाशकांनी कृपया कवितासंग्रहाच्या पुस्तकाच्या दोन प्रती दि. २० डिसेम्बर २०१६ पर्यंत या पत्त्यावर पाठवावीत. पत्ता - कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, ४९६ सदाशिव पेठ, टिळक रस्ता, पुणे-४११०३०.