मसापच्या व्यक्तिवेध कार्यक्रमात १९ डिसेम्बरला उलगडणार नारायण सुर्वेंचा जीवनपट

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, आशय सांस्कृतिक आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'व्यक्तिवेध' या कार्यक्रमात कविवर्य नारायण सुर्वे यांचा जीवनपट व्याख्यान आणि ध्वनिचित्रफितीतून उलगडणार आहे.
१९ डिसेम्बरला सायं. ६. ०० वाजता हा कार्यक्रम मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे कविवर्य नारायण सुर्वे या विषयावर व्याख्यान होणार असून व्याख्यानानंतर नारायण सुर्वे यांचा जीवनपट उलगडून दाखविणारी ध्वनीचित्रफीत दाखवली जाणार आहे. ८ नोव्हेंबरला पुलंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मसापच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.