"मसाप च्या का. र. मित्र स्मृती व्याख्यानमालेला २० डिसेंबरपासून प्रारंभ"
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने 'मासिक मनोरंजन' कार का. र. मित्र स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन २० डिसेम्बर ते २२ डिसेम्बर या कालावधीत करण्यात आले आहे. या वर्षीची व्यख्यानमाला 'विनोद' या विषयाला वाहिलेली आहे. या व्यख्यानमालेचे उदघाटन २० डिसेम्बर रोजी प्रसिद्ध साहित्यिक शिवराज गोर्ले यांच्या हस्ते होणार असून त्यांचे 'विनोदी लिहिताना' या विषयावर व्यख्यान होणार आहे. २१ डिसेम्बरला प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांचे व्यंगचित्रे आणि विनोद या विषयावर व्याख्यान होणार आहे. २२ डिसेम्बर रोजी या व्याख्यानमालेचा समारोप प्रसिद्ध लेखक श्रीनिवास भणगे यांच्या चित्रपटातील विनॊद या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. ही व्याख्यानमाला सायं. ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.