मसापतर्फे स्मरण डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि स्वायत्त मराठी विद्यापीठ बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने 'स्मरण दभिंचे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २७ जानेवारी २०१७ रोजी सायं. ६.३० वाजता हा कार्यक्रम मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात बदलापूरच्या स्वायत्त मराठी विद्यापीठाचे संस्थापक श्याम जोशी, प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर, साहित्यिक भारत सासणे आणि पदमगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे सहभागी होणार आहेत. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत.