'मूल्यभानाची सामग्री' या ग्रंथाला रा. श्री. जोग समीक्षा पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, दरवर्षी प्रख्यात समीक्षक कै. रा. श्री. जोग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, एका समीक्षा ग्रंथाला, विशेष पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी, ज्येष्ठ समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांच्या 'मूल्यभानाची सामग्री' या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. ग्रंथाचे प्रकाशक म्हणून शब्द प्रकाशन, मुंबईचे येशू पाटील यांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. मंदा खांडगे आणि डॉ. रेखा इनामदार-साने यांच्या निवड समितीने या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
हा पुरस्कार प्रदान समारंभ, बुधवार दि. २२ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.