मसाप ब्लॉग  

कवी विष्णु थोरे यांना कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार

February 20, 2017

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने दरवर्षी एका कवितासंग्रहाला कॉंटिनेंटल प्रकाशन पुरस्कृत कै. कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार, कवी विष्णू थोरे (चांदवड, जि. नाशिक) यांच्या 'धूळपेरा उसवता' या कवितासंग्रहाला दिला जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा संग्रह प्रकाशित करणाऱ्या नाशिकच्या अक्षरबंध प्रकाशनाचे, प्रवीण जोंधळे यांनाही पुरस्कार दिला जाणार आहे, 

कवी स्वप्नील पोरे आणि प्रकाश घोडके यांच्या निवड समितीने या कवितासंग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली. 

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मनोहर जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान समारंभ, सोमवार, दि. २७ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी ६.३० वा. म.सा.प. च्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. 

प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाला प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive
Please reload

Search By Tags