top of page

मसाप ब्लॉग  

नाटककार सावरकर हा सावरकरांचा पैलू उपेक्षितच :- ज्येष्ठ लेखक श्यामसुंदर मुळेस्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. नाटककार हा त्यांचा एक पैलू होता. दुर्दैवाने त्यांचा हा पैलू उपेक्षित राहिला. याबाबतीत त्यांचे संस्कृत नाटककार भवभुती य़ांच्याशी साम्य अाढळते. भवभूतीला ज्याप्रमाणे मरणोत्तर कीर्ती मिळाली त्याप्रमाणेच नाटककार स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करावे, असे मत ज्येष्ठ लेखक श्यामसुंदर मुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात सावरकर या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

मुळे म्हणाले की, रत्नागिरीला स्थानबद्ध असतांना सावरकरांनी उःशाप, सन्यस्तखड्ग आणि उत्तरक्रिया अशी तीन संगीत नाटके लिहीली. उःशाप नाटकामध्ये मध्ये जातिभेद हा हिंदूधर्माला लागलेला शाप असून जातींचे निर्मूलन हा उःशाप आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले. तर वीर पुरुषाचे खड्ग अर्थात तलवार कधीही सन्यस्त म्हणजेच निवृत्त होऊ नये असे त्यांनी सन्यस्तखड्ग मध्ये म्हटले आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्याप्रमाणे त्याची आपण उत्तरक्रिया म्हणजेच श्राद्ध करतो त्याचप्रमाणे राष्ट्राच्या पराभवाची उत्तरक्रिया म्हणजे पराभवाचा सूड उगवणे त्यावर विजय मिळवणे होय. असे सावरकरांनी उत्तरक्रिया या संगीत नाटकातून दाखवले आहे.


सावरकरांचे साधे सोपे सहज संवाद कै.गो.ब.देवलांची आठवण करुन देतात. तर सावरकरांची भाषा शैली गडकऱ्यांच्या भाषा शैलींची आठवण करुन देतो. सावरकरांनी त्यांच्या नाटकांतून आणि ईतर साहित्य निर्मीतीतून समाजातील अनिष्ट रुढी, चाली रिती परंपरांवर कोरडे अोढले. तसेच त्यांच्या नाटकांतून त्यांतून मांडलेल्या विषयांतून सावरकरांना भारताबाबत वाटत असलेला जाज्वल्य अभिमान देखील अधोरेखीत होतो. असे मुळे सांगितले.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page