"मसाप गप्पा" मध्ये डॉ. अरुणा ढेरे यांच्याशी संवाद

सोमवार, दि. ०६ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६. १५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉ. अरुणा ढेरे सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी लेखिका नीलिमा बोरवणकर संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात वयाची ६० वर्ष पूर्ण केल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.