top of page

मसाप ब्लॉग  

"मसाप गप्पा" मध्ये रंगल्या डॉ. अरुणा ढेरे यांच्याशी गप्पा


सोमवार, ०६ मार्च २०१७ रोजी सायंकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉ. अरुणा ढेरे सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याशी लेखिका नीलिमा बोरवणकर यांनी संवाद साधला. या कार्यक्रमात वयाची ६० वर्ष पूर्ण केल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. श्रोत्यांच्या उदंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. सभागृह तर भरले होतेच पण गॅलरी, व्यासपीठाच्या पायऱ्या आणि व्यासपीठावरही लोक बसले होते. डॉ. ढेरे बरोबरच्या संवादातून श्रोत्यांना श्रीमंत करणारी बौद्धिक मेजवानी मिळाली.Featured Posts
Recent Posts
Archive