'कथासुगंध'
कथासुगंध कार्यक्रमात मंगला गोडबोले यांचा सहभाग

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कथासुगंध कार्यक्रमात सुप्रसिद्ध कथालेखिका मंगला गोडबोले सहभागी होणार आहेत. त्यांच्या आईच्या हाताची आमटी व पायरी या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे कलावंत करतील. त्यानंतर लेखिका मंगला गोडबोले या कथांमागची कथा उलगडणार आहेत. बुधवार, दि. २२ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुण्यातील माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.