मसाप ब्लॉग  

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्य अहवाल : १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७

April 6, 2017

 महाराष्ट्र साहित्य परिषदेची धुरा कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे १ एप्रिल २०१६ पासून आली. त्यांच्याबरोबर प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून एका वर्षात मसापला प्रगतीपथावर नेण्यासाठी दमदार पावले टाकली त्याचा हा कार्य अहवाल.

 

१. साहित्य परिषदेचे जन्मस्थळ असलेल्या मळेकर वाड्याची आणि मसापचे संस्थापक न्या. महादेव गोविंद रानडे, साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा माधवराव पटवर्धन सभागृहात स्थापित केल्या. 

२. ज्येष्ठ साहित्य सेवक म. श्री. दीक्षित यांचे नाव 'मसाप'च्या पायरीला देऊन साहित्यसेवकांचे प्रातिनिधिक स्मारक 

३. साहित्य परिषदेतील माधवराव पटवर्धन सभागृहाचे नूतनीकरण.  

४. अ) साहित्य परिषदेला ई-अक्टिव्ह केले. संकेतस्थळाची पुनर्निर्मिती, फेसबुक पेज, व्हॉट्सअॅ प ग्रुप, ब्लॉग, ट्विटर खाते तयार आणि युनिकोडचा प्रभावी वापर. निर्मितीपासून आजपर्यंत संकेतस्थळ अद्ययावत तंत्रज्ञानाचा परिषदेला लोकाभिमुख करण्यासाठी प्रभावी वापर.

४. ब) महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे अंक व्हॉट्सअॅाप, फेसबुक आणि संकेतस्थळाद्वारे  २५०००+ व्यक्तींना वितरीत. 

४. क) मसापच्या व्हॉट्सअॅ प ग्रुपला ३००० पेक्षा जास्त साहित्यिक-रसिक जोडले.

४. ड) संकेतस्थळावर नि:शुल्क लेखक अणि वाचक नोंदणीची व्यवस्था केली.

 ५. मराठी वाङमयाचा इतिहास खंड १ ते ७, मराठी भाषा : साहित्य आणि संशोधन हे ग्रंथ तंत्रस्नेही वाचकांसाठी बुक गंगाच्या मदतीने ई - बुक रूपात ही ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली. 

६. साहित्य परिषदेच्या स्वतंत्र संशोधन विभागाची स्थापना त्याद्वारे संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे पुस्तक अंतिम टप्प्यात, १०५ वर्षातील निवडक म. सा. पत्रिका प्रकल्पाचे काम सुरु 

७. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाशी सामंजस्य करार आणि साहित्य या विषयाचे ज्ञानमंडळ म्हणून 'मसाप' ला मान्यता भारतीय साहित्य, विश्वसाहित्य, लोकसाहित्य व लोकसंस्कृती या तीन विषयांची जबाबदारी. 

८. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली चाळीस लेखकांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन. 

९. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याची आग्रही मागणी करणारे पत्र मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचा उपक्रम. आजवर नव्वद हजार पत्र रवाना. 

१०. शिक्षणातील मराठीच्या सद्यस्थितीविषयी चिंतन करण्यासाठी मराठी विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन. 

११. शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांसाठी 'सुलभ मराठी शुद्धलेखन' पुस्तिकेची निर्मिती आणि संकेतस्थळावरून मोफत डाउनलोड करून घेण्याची सुविधा 

१२. शाळेतील शिक्षकांसाठी शुद्धलेखन कार्यशाळेचे आयोजन.  

१३. शालेय विद्यार्थ्यांसाठी 'लेखक तुमच्या भेटीला' हा उपक्रम. 

१४. अ. भा. मराठी साहित्य महामंडळ आणि मसाप यांच्या संयुक्त विद्यमाने 'अनुवाद कार्यशाळे'चे आयोजन. अनुवाद प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 

१५. संकेतस्थळावर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण तत्काळ उपलब्ध करून देण्यास प्रारंभ आणि मोफत डाउनलोड करण्याची सुविधा. 

१६. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांचे प्रस्तावित अध्यक्षीय भाषण ९ वर्षानंतर मसापच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांच्या पुस्तकातही समावेश  

१७. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आंबेडकरी विचारांना वाहिलेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे पाटण येथे आयोजन. 

१८. पुणे आणि परिसरात फिरणारा संमेलनाचा लंबक ग्रामीण भागाकडे नेला. पाटण, चाळीसगाव, रत्नागिरी आणि पाचोरा अशा ठिकाणी संमेलने. 

१९. ऐतिहासिक आणि वाङमयीन परंपरा लाभलेल्या माधवराव पटवर्धन सभागृहाचा अमृत महोत्सव साजरा केला. त्यानिमित्ताने माधवराव पटवर्धन स्मृतिदिनानिमित्त साहित्यप्रेमीच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्याची प्रथा सुरु. 

२०. विश्व पंजाबी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या सत्काराचे आयोजन आणि संमेलनात सहभाग. 

२१. सरहद, साहित्यदीप प्रतिष्ठान, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, एकपात्री कलाकार परिषद, आशय सांस्कृतिक आणि अक्षरधारा या सारख्या संस्थांच्या सहयोगाने विविध वाङमयीन कार्यक्रमांचे आयोजन. 

२२. वंचित मुलांसाठी परिषदेच्या इतिहासात प्रथमच 'अक्षरदिवाळी' चा उपक्रम. 

२३. लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती, गोनिदा जन्मशताब्दी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांचा सत्कार, मराठी प्रकाशक परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार, रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यावरील कार्यक्रम, कमला नाटकाचे वाचन, कथाकथन अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन.

२४. नेहमीच्या जयंती स्मृतिदिन, व्याख्याने आणि पुरस्कार या खेरीज मसाप गप्पा, कथासुगंध, एक कवी एक कवयित्री, व्यक्तिवेध अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन त्यातून नैमित्तिक कार्यक्रमाखेरीज ३० नवे कार्यक्रम सादर झाले.

२५. पुण्यात भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा पुतळा उध्वस्त केल्यानंतर त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी सक्रिय सहभाग. डोंबिवली येथे झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या घटनेच्या निषेधाचा ठराव करण्यात यावा यासाठी मसाप तर्फे पुढाकार. 

२६. परीक्षा विभागातर्फे साहित्य प्राज्ञ आणि विशारद या परीक्षांच्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना. विद्यार्थी संख्येत वाढ. 

२७. इमारतीचे बाहेरून रंगकाम. 

२८. मसापत्रिकेच्या संपादक मंडळावर प्रथमच कार्यकारी मंडळातील सदस्य सोडून साहित्य क्षेत्रातील जाणकार आणि प्राध्यापकांना स्थान. 

२९. मसापत्रिकेत शाखांच्या कार्यवृत्तांना अधिक स्थान. 

३०. 'जेथे शाखा तेथे बैठक' या उपक्रमाचा प्रारंभ. वर्षातून तीन बैठका पुण्याबाहेर होणार. 

३१. साहित्य परिषदेच्या आजीव सदस्यत्वाचा अर्जात बदल. संकेतस्थळावरून मोफत डाउनलोड करण्याची सुविधा. 

३२. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८०% नव्या लेखक-कवींना स्थान ग्रामीण भागाला प्राधान्य. 

 

शाखांसाठी राबविलेले उपक्रम

१. वर्षभरात ३२ शाखांना प्रत्यक्ष भेटी. 

२. जिल्हा प्रतिनिधींची अधिकार कक्षा वाढविली. त्यांची शिफारस जिल्ह्यातील नवीन शाखेच्या मंजुरीसाठी अनिवार्य केली. 

३. जिल्हा प्रतिनिधींना शाखांचे पालकत्व  दिले. त्यातून शाखा सुधार, आर्थिक सबलीकरण कार्यक्रम, प्रायोजकत्व मिळवणे, वाद मिटविणे यांना गती देण्याचा प्रयत्न. 

४. शाखा सतत उपक्रमशील राहाव्यात यासाठी मसाप शाखा आणि तेथील शिक्षणसंस्थांमध्ये साहित्य-सहयोग करार घडवून आणले. त्यातून शाखा गतिमान. 

५. शाखा सबलीकरण नमुना सर्व शाखांकडून भरून घेतला त्याद्वारे शाखांच्या कार्याचा आणि आर्थिक वस्तूस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न. 

६. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीच्या पंतप्रधानांना पत्र पाठविण्याच्या उपक्रमात शाखांना सक्रिय सहभाग दिला. 

७. पुण्यातील स्मृतीदिन - व्याख्याने या कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण.

८. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत जिल्हा प्रतिनिधींकडून नावे मागवून त्यांचा यादीत समावेश.  यादी सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न. 

९. अ. भा. मराठी साहित्य संमेलनात लेखक/कवींच्या सहभागासाठी जिल्ह्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न. प्रतिनिधींकडून नावे मागवून समावेश. 

१०. 'पुण्याबाहेरील कार्यवाह' असा शब्दप्रयोग टाळून 'विभागीय कार्यवाह' हा शब्द रूढ केला. 

 

नव्या शाखा, सभासद आणि देणग्या 

९ नव्या शाखांना मान्यता 

दामाजीनगर, पलूस, मनोरमा, भडगाव, अंमळनेर, जयसिंगपूर-शिरोळ, जेजुरी, सोपाननगर, येलूर  

या वर्षात झालेले एकूण आजीव सभासद : ७६०

या वर्षात मिळविलेली एकूण देणगी : ५,९६,००१=०० 

 

पुढील काळातील उपक्रम

१. दर दोन महिन्यांनी होणार कथा, कविता, कादंबरी, ललित लेखनाच्या आणि स्वामित्व हक्क तसेच साहित्य आस्वादाच्या कार्यशाळा. 

२. शाखांचे आर्थिक सबलीकरण. 

३. घटनेच्या मसुद्याला अंतिम रूप देणे. 

४. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण. 

५. मतदारांना ओळखपत्र देण्याचा उपक्रम. 

६. मसाप ग्रंथालयाचे आधुनिकीकरण आणि संगणकीकरण. 

७. दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्यासाठी 'ग्रंथ दत्तक योजना' प्रभावीपणे राबविणार. 

८. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी १ मेला लेखकांचे आणि वाङमयीन कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन.

९. बालकुमारांमध्ये साहित्याची आणि वाचनाची आवड कशी निर्माण करावी यासाठी पालकांच्या कार्यशाळा.  

१०. बालकुमारांसाठीचे साहित्यसंमेलन शाखांच्या मदतीने घेणार.

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive