'मसाप' चे डॉ. आंबेडकरांना 'ग्रंथप्रदर्शना'तून अनोखे अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना 'मसाप' तर्फे ग्रंथप्रदर्शनातून अनोखे अभिवादन करण्यात येणार आहे. १४ एप्रिल रोजी सायं. ५.०० वा. या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन आमदार जयदेव गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. भीम गायकवाड उदघाटनापूर्वी भीमवंदना सादर करणार आहेत. हे ग्रंथप्रदर्शन १५ एप्रिल रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत साहित्य प्रेमींसाठी खुले राहणार आहे. या ग्रंथ प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या आणि डॉ. आंबेडकरांवर लिहिल्या गेलेल्या ग्रंथांचा समावेश असणार आहे. हे ग्रंथप्रदर्शन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात भरविण्यात येणार आहे. अशी माहिती 'मसाप' चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.