"बदलत्या भारताच्या प्रगतीत डॉ. बाबासाहेबांचे विचार मार्गदर्शक" : मा. जयदेव गायकवाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविध विषयांवरील चिंतन खुप मोठे आहे. आजचा भारत बाबासाहेबांच्या विचारांमुळे कसा बदलतो आहे. प्रत्येक प्रगतीला, बाबासाहेबांचे विचार प्रेरणा देणारे आहेत. बदलत्या भारताच्या प्रगतीत डॉ. बाबासाहेबांचे विचार मार्गदर्शक आहेत. असे मत आमदार जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केले.
निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या व त्यांच्यावर लिहिलेल्या दुर्मिळ ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित केलेले आहे. ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन आमदार जयदेव गायकवाड यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ संपादक मा. अरुण खोरे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, प्रदर्शनाचे समन्वयक कार्यवाह वि. दा. पिंगळे, मसापचे कार्यवाह प्रमोद आडकर, माधव राजगुरू, उद्धव कानडे, दीपक करंदीकर, राजन लाखे, डॉ. अरविंद संगमनेरकर, उपस्थित होते. डॉ. भीम गायकवाड व दीपक करंदीकर यांच्या भीमवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ' ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब, तसेच दलित साहित्याने मराठी वाङ्मयात स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. दलित साहित्य आत्मकथनांच्या खुप पुढे गेले आहे. तिथपर्यंत समीक्षकांनी पोहोचायला हवे अशी अपेक्षा प्रा. जोशी यांनी व्यक्त केली.' मा. अरुण खोरेंनी डॉ. बाबासाहेबांचे विचार, ग्रंथ समतेची भूमिका सदैव देशाला दिशा आणि प्रेरणा देत राहील.' आभार प्रकाश पायगुडे यांनी मानले आणि वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. हे प्रदर्शन १५ एप्रिल २०१७ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहील.

