कै. कृष्ण मुकुंद पुरस्कार 2017


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, संशोधनात्मक लेखनासाठी प्रतिवर्षी 'कृष्ण मुकुंद (उजळंबकर) स्मृती पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या सन २०१७ च्या पुरस्कारासाठी, श्री. शिवाजीराव एक्के (पुणे) यांच्या 'पुरंदरचे धुरंधर' ग्रंथास हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी प्रा. प्रदीप आपटे आणि पत्रकार मयुरेश प्रभुणे यांच्या ग्रंथनिवड समितीने या ग्रंथाची निवड केली. हा पुरस्कार प्रदान समारंभ, सोमवार दिनांक २४ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात, इतिहासतज्ज्ञ adv. उमेश सणस (वाई) यांच्या हस्ते होणार आहे.
