"प्रा. रा. ग. जाधव यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने मसापमध्ये विशेष व्याख्यान"
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साधना साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने गुरुवार दि. २५ मे २०१७ रोजी ज्येष्ठ समीक्षक प्रा. रेखा साने-इनामदार यांचे "आजचा समीक्षा व्यवहार" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभ्यासक विनय हर्डीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील हा कार्यक्रम सायं. ६. १५ वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. यावेळी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.