"डॉ. यश वेलणकर आणि डॉ संज्योत देशपांडे यांच्या ग्रंथांना मसाप चा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्का
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे तर्फे दरवर्षी डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत कै. प्राचार्य शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार, तत्वज्ञान / नीती / अध्यात्म / मानसशास्त्र विषयक ग्रंथाला दिला जातो. या वर्षीचा हा पुरस्कार 'ध्यान विज्ञान' या ग्रंथासाठी डॉ. यश वेलणकर याना आणि 'अटळ दुःखातून सावरताना' या ग्रंथासाठी डॉ. संज्योत देशपांडे याना विभागून दिला जाणार आहे. रुपये ५०००/- आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी ग्रंथांची निवड डॉ. मुकुंद दातार व डॉ. आरती दातार यांच्या निवड समितीने केली.
ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान समारंभ शनिवार दि. ८ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती 'मसाप' चे कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.