" माया धुप्पड आणि गोविंद गोडबोले यांना कै. बाबुराव व कै. शांतादेवी शिरोळे स्मृती पुरस्कार जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने कै. बाबुराव व कै. शांतादेवी शिरोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, बालसाहित्यकारांना मानाचे दोन विशेष पुरस्कार दिले जातात.
यावर्षीच्या सन २०१७ च्या, कै. बाबुराव शिरोळे पुरस्कारासाठी, बालसाहित्यकार म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, जळगाव येथील साहित्यिक श्रीमती माया धुप्पड आणि मिरज येथील साहित्यिक गोविंद गोडबोले यांना दिला जाणार आहे. रोख रक्कम व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार प्रदान समारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांच्या हस्ते आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. १३ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. समारंभ सर्वांसाठी खुला आहे. अशी माहिती 'मसाप' चे कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.