डॉ. न. म. जोशी यांचे व्याख्यान
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने साहित्यिक कै. वामन मल्हार जोशी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. "मराठी साहित्य : चरित्र आणि चारित्र्य" हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गुरुवार दिनांक २० जुलै २०१७ रोजी सायं. ६. ३० वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.