'मसाप गप्पा' मध्ये शि. द. फडणीस यांच्याशी गप्पा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार शि. द. फडणीस सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी चारुहास पंडित संवाद साधणार आहेत. सोमवार दिनांक २४ जुलै २०१७ रोजी सायं. ६. ३० वाजता हा कार्यक्रम मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.