'मसाप'मध्ये सादर होणार पु. शि. रेगेंच्या साहित्यावर आधारित 'सृजनरंग'
महाराष्ट्र साहित्य परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक (कै.) पु. शि. रेगे यांच्या निवडक कविता आणि कथांच्या अभिवाचनाचा समावेश असलेला 'सृजनरंग' हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरने या कार्यक्रमाची निर्मिती केली असून कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन, संकलन आणि संगीन प्रमोद काळे यांचे आहे. या कार्यक्रमात हर्षद राजपाठक, वेदांत रानडे, ओम श्री बडगुजर, अमृता पटवर्धन आणि सचिन जोशी यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. २६ जुलै २०१७ रोजी सायं. ६.३० वा. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद ४९६, सदाशिव पेठ, टिळक रस्ता, पुणे ४११०३०. दुरभाष - ०२० - २४४७५९६३,३२५४५६५९