"डॉ. मेहेंदळे यांचा साहित्य परिषदेतर्फे सत्कार"
साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर झाल्याबद्दल, ज्येष्ठ संस्कृत पंडित डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचा, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घरी जाऊन मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पुणेरी पगडी,उपरणे, पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन सत्कार केला. यावेळी कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होत्या. या सत्काराबद्दल आनंद व्यक्त करून मेहेंदळे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
