मसापच्या 'लेखक तुमच्या भेटीला' कार्यक्रमात इंदुमती जोंधळे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे सहभागी होणार आहेत. अप्पा बळवंत चौकातील नूतन मराठी विद्यालयातील मुलांशी त्या संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कार्यवाह माधव राजगुरू यांनी दिली.