डॉ. आनंद यादव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, मेहता पब्लिशिंग हाऊस, ग्रामीण साहित्य परिषद, यादव परिवार आणि मित्रमंडळींच्या वतीने 'डॉ. आनंद यादव जीवन आणि साहित्य' या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार असून माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी आहेत.
या चर्चासत्रात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ग्रामीण साहित्य परिषदेचे (औरंगाबाद) मुख्य कार्यवाह डॉ. वासुदेव मुलाटे, मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता सहभागी होणार आहेत. या समारंभाला मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, ग्रामीण साहित्य परिषदेचे सहकार्यवाह डॉ. गणेश देशमुख, डॉ. यादव यांच्या कन्या डॉ. कीर्ती मुळीक, साहित्य शिवारचे संपादक जयराम देसाई उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम गुरुवार ३० नोव्हेंबर २०१७ रोजी सायं. ५. ३० वाजता. एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात होणार आहे.