'साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार'
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा बुधवार दिनांक १३ डिसेम्बर २०१७ रोजी सायं. ६.१५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
