top of page

मसाप ब्लॉग  

बडोदा संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा मसापतर्फे २३ डिसेम्बरला सत्कार


पुणे : ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १६,१७ आणि १८ फेब्रुवारी २०१८ ला बडोद्याला होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने विशेष सत्कार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी बडोदा संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, कार्यवाह वनिता ठाकूर, आशिष जोशी, मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त उल्हासदादा पवार उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ शनिवार दि. २३ डिसेम्बर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, 'महाराष्ट्रातील मराठी बांधवांना संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड या साहित्यसस्थांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रथमच येणार आहेत. बडोद्याचा आणि महाराष्ट्राचा जुना ऋणानुबंध आहे. प्रागतिक दृष्टीचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महाराष्ट्रातील सारस्वतांना, कलावंतांना आणि विद्वानांना बळ दिले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९३२ साली कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या १८ व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हा स्नेहानुबंध आणि संमेलनाचे औचित्य साधून राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा सत्कार करताना परिषदेला आनंद होत आहे.


Featured Posts
Recent Posts
Archive