साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा मिलिंद जोशी

पुणे : बलभीम साहित्य संघ कुद्रेमनी (जि. बेळगाव) यांच्या वतीने आयोजित १२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि लेखक प्रा मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील बेळगांव जिल्ह्यातील कुद्रेमनी येथे होणाऱ्या साहित्य सम्मेलनाचे हे 12 वे वर्ष आहे. सीमाभागातील मराठी बांधवांचे मनोबल वाढविण्यासाठी हे सम्मेलन प्रतिवर्षी घेतले जाते. ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा, मराठी अभिमान गीत सादरीकरण, परिसंवाद, कविसम्मेलन, कथाकथन, पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या सम्मेलनात करण्यात आले आहे कन्नडिगांच्या मराठी भाषकांवरील अत्याचाराचा सामना करीत सीमाभागातील मराठी बांधव अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती जपत आहेत ते सीमेवरचे मराठी भाषेचे सैनिक आहेत त्यांना मराठी बांधवांनी भावनिक पाठबळ देणे महत्वाचे आहे, अशी भावना प्रा. जोशी यांनी व्यक्त केली.