मसाप ब्लॉग  

''अभिजात' साठीची कृतिशील कार्यवाही विचाराधीन''

January 6, 2018

पंतप्रधान कार्यालयाचे मसाप कार्याध्यक्षांना पत्र
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला चांगलेच यश मिळाले आहे. मराठीला अभिजातचा दर्जा देण्यासाठीची कृतिशील कार्यवाही विचाराधीन आहे, असे पत्र पंतप्रधान कार्यालयातील सांस्कृतिक मंत्रालयाच्या सचिवांचे विभागीय अधिकारी कुमार शैलेंद्र यांनी मसाप चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना पाठविले आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालय पोर्टल (PMOPG/D/2017/0589953 dated 20/12 /2017) वर माहिती देण्यात आली आहे. 

      प्रा. जोशी म्हणाले, 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करण्यात मसाप ने पुढाकार घेतला त्यासाठी लोकचळवळ उभी केली. लेखकांची बैठक, पंतप्रधान कार्यालयाला मसाप चे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी शाहुपुरी शाखेमार्फत पाठविलेली एक लाखाहून अधिक पत्रे, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाबाबत भूमिका घ्यावी यासाठी मसाप शिष्ट मंडळाने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे धूळ खात पडलेल्या अभिजात साठीच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू झाली. सहा महिन्यांपूर्वी मसाप ने पाठविलेल्या  पत्राला उत्तर देताना मद्रास उच्च न्यायालयायातील याचिका निकाली निघाल्याने सांस्कृतिक कार्यालयाला सुधारित कॅबिनेट नोट तयार करण्यासाठी आदेश देण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. पण त्यानंतर सहा महिन्यात कोणतीच ठोस कार्यवाही न झाल्यामुळे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ८ डिसेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयाशी पत्र व्यवहार करून नवीन वर्षात मराठी भाषादिनीपूर्वी मराठीला अभिजातदर्जा देण्याासाठी ठोस आश्वासन द्यावे अन्यथा  जानेवारीत दिल्लीत मराठी प्रेमींसमवेत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, तसे पत्रही पंतप्रधान कार्यालयाला पाठविले  होते. या आंदोलनात छत्रपती घराण्याचे वारसदार या नात्याने सहभागी होण्याचा निर्णय साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला होता. परिषदेच्या पत्राला उत्तर देताना अभिजातच्या कृतिशील कार्यवाही साठी केंद्रसरकर विचाराधीन असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे मराठी भाषकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.  नव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदाची बातमी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive
Please reload

Search By Tags