'मसाप तर्फे अभिजातसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन'
पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्तिशः पाठपुरावा करावा यासाठी त्यांची भेट घेऊन कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी साहित्य परिषदेतर्फे त्याना पत्र दिले. सोबत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, ज्येष्ठ कवयित्री डॉ अरुणा ढेरे आणि डॉ सतीश देसाई. पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्काळ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना फोन लावून त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली.
