महाराष्ट्र साहित्य परिषदेत रंगले 'डॉक्टर, तुम्हीसुद्धा' नाटकाचे अभिवाचन
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि नाट्यगंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. अजित दळवी लिखित 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' या नाटकाचे अभिवाचन डॉ. मधुरा कोरान्ने, सिद्धार्थ जोशी, ओंकार जाधव आणि चित्रा देशपांडे यांनी केले. हे अभिवाचन खूप रंगले. अभिवाचनाच्या या कार्यक्रमाला रसिकांनी गर्दी केली होती. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह बंडा जोशी उपस्थित होते. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.
