'कथासुगंध कार्यक्रमात राजेंद्र माने यांच्या कथांचे अभिवाचन'

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कथासुगंध या कार्यक्रमात प्रसिद्ध कथाकार राजेंद्र माने सहभागी होणार आहे. त्यांच्या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे विद्यार्थी करणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार दि. १७ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.