डॉ. न. म. जोशी यांच्याशी गप्पा आणि सत्कार

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. न. म. जोशी यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम मसापच्या 'मसाप गप्पा' या उपक्रमात होणार आहे. डॉ. न. म. जोशी यांच्याशी डॉ. विनिता आपटे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात वयाची ८२ वर्ष पूर्ण केल्याबद्दल डॉ. न. म. जोशी यांचा विशेष सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम बुधवार दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.