मसाप मध्ये रंगणार गझलांची मैफल
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एक कवयित्री एक कवी या कार्यक्रमात प्रसिद्ध गझलकार भूषण कटककर आणि सुप्रिया जाधव सहभागी होणार आहेत. त्यांच्या बरोबरच्या गप्पा आणि गझला ऐकण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे. कवी उध्दव कानडे आणि प्रमोद आडकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी ६.०० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली.