'मसाप' मध्ये कुसुमाग्रजांना अभिवाचनातून अभिवादन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या लेखणीतून साकारलेल्या 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकाचे अभिवाचन करण्यात येणार आहे. असंख्य भारतीय क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे. अंजली लाळे, संज्ञा कुलकर्णी, वैशाली कणसकर, मधुरा शहाणे, जया जुन्नरकर हे या अभिवाचनात सहभागी होणार आहेत. मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.