'मसापचा कवी यशवंत पुरस्कार शांताराम खामकर याना जाहीर'
रेखा इनामदार-साने यांच्या हस्ते होणार प्रदान

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या वतीने, एका काव्यसंग्रहाला कवी यशवंत स्मृती पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या पुरस्कारासाठी, कवी शांताराम खामकर (श्याम) यांच्या 'भवताल' या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रु. १०००/- आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वप्नील पोरे आणि प्रभा सोनवणे यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी ग्रंथाची निवड केली.
हा पुरस्कार प्रदान समारंभ शुक्रवार, दि. ९ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रेखा इनामदार-साने यांच्या हस्ते आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.