स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यान

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आयोजित महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंराव चव्हाण जन्मशताब्दीवर्षात महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून शंभरच्या वर व्याख्याने देणारे तसेच महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्याची चरित्र व त्यांच्या कार्यपध्दतीचा आणि राजकारणाचा सखोल अभ्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे हे 'महाराष्ट्राचे सुवर्णपान यशवंतराव चव्हाण' या विषयावर व्याख्यान देणार आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. १२ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी दिली.