'मसाप गप्पा' मध्ये प्राण किशोर कौल यांच्याशी गप्पा

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात पदमश्री पुरस्काराने सन्मानित ख्यातनाम काश्मिरी ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि दिग्दर्शक प्राण किशोर कौल सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्राण किशोर कौल यांचा दोन्ही संस्थांच्या वतीने विशेष सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सरहदचे संजय नहार, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. गुरुवार १५ मार्च २०१८ रोजी सायं. ६.१५ वा. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.