डॉ, शिरवाडकर, डॉ. पानतावणे आणि डॉ. ढवळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मसापतर्फे २ एप्रिलला श्रद्धा
पुणे : ज्येष्ठ समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर, ज्येष्ठ साहित्यिक, संपादक डॉ. गंगाधर पानतावणे आणि ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ, प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार २ एप्रिल रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात श्रद्धांजली सभा घेण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.