साहित्य परिषदेत रंगणार कवितांची मैफल


पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एक कवयित्री एक कवी या कार्यक्रमात प्रसिद्ध कवयित्री नीरजा आणि कवी अरुण म्हात्रे सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर संवाद साधणार आहेत. नीरजा आणि म्हात्रे यांच्या कविता ऐकण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार ९ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.