मसाप ब्लॉग  

महामंडळ साहित्याचे उत्तराधिकारी नाही : अरुण म्हात्रे

April 10, 2018

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुणे: 'साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ठरविण्याचा महामंडळाला काय अधिकार आहे? कुठलेही सभासद असलेले महामंडळ म्हणजे काँग्रेस कमिटी किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. महामंडळ या संस्थेलाच आमचा विरोध आहे. निर्णय घेणारे महामंडळ कोण? महामंडळ हे मराठी साहित्याचे उत्तराधिकारी नाही,' अशा शब्दांत प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी सोमवारी साहित्य महामंडळावर तोफ डागली. 'अध्यक्षपदासाठी मते मागणे योग्य नाही. हे पद सन्मानानेच

 

 

दिले पाहिजे,' असे मत प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी मांडले.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'एक कवयित्री, एक कवी' या कार्यक्रमात ते बोलत होते. कवी उद्धव कानडे व अॅड. प्रमोद आडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.

साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीने नव्हे, तर सन्मानाने निवडला पाहिजे, असा ठराव साहित्य परिषदेने केला आहे. या संदर्भाने कानडे यांनी संमेलनाचा अध्यक्ष कसा निवडला पाहिजे, असा प्रश्न म्हात्रे आणि नीरजा यांना विचारल्यानंतर त्यांनी निवडणूक पद्धतीला कडाडून विरोध केला. 'काही विचारले तरी ते नियमात नाही, असेच उत्तर महामंडळाचे अध्यक्ष देतात,' असा टोला म्हात्रे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांना लगावला. म्हात्रे आणि नीरजा यांनी आपल्या कवितेतून उपस्थितांना अस्वस्थ केले.

'कवीला काही मिळत नाही'

'कंपन्यांमधील सुटा-बुटातील कामगार अनिश्चिततेच्या टोकावर आहेत. अशा घटकांवर कविता लिहिल्या पाहिजेत. झरा म्हणजे गाणे असते. नदीखालची खोली म्हणजे कविता असते. लिखाणाला आपल्याकडे किरकोळीत काढले जाते. लेखक-कवींना गंभीरपणे घेतले जात नाही. कलाकारांना केवळ हात दाखविण्यासाठी भरमसाठ पैसे दिले जातात. कवी एक तास ओरडला, तरी काही मिळत नाही. कवीने कमी पैसे घ्यायचे हे आपल्या संस्कृतीचे निदर्शक आहे,' असे टीकास्त्र अरुण म्हात्रे यांनी सोडले.

 

शब्द हे अस्वस्थता व्यक्त होण्याचे माध्यम आहे. मला पुरुष नाकारणारा स्त्री वाद मान्य नाही. भांडण पुरुषाशी नाही, तर पुरुषसत्ताक पद्धतीशी आहे. स्त्रियांमध्ये भगिनीवाद निर्माण करणे हे स्त्रीवादाचे काम आहे. पुरुषावर कुणाचा अधिकार आहे, यावरून घरा-घरात असुरक्षितता असते. कारण महिलांचे स्थान पुरुष केंद्रित आहे. ग्रामीण, दलित, ब्राह्मणी, महानगरी हे लेखक-कवींचे कप्पे केवळ विद्यापीठीय अभ्यासासाठी आहेत. हल्ली कवींचे पीक आले आहे. त्यांच्या कवितेमध्ये विधाने असतात. प्रतिक्रियात्मक कविता टाळली पाहिजे.

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive