परिवर्तनाच्या कवितेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त मसापच्या वतीने अभिवादन करण्यासाठी 'परिवर्तनाच्या कविता' हा कार्यक्रम आयोजित केला होता. सुप्रसिद्ध कवी डॉ. मनोहर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले. प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर, शाहीर बाबा जाधव, अंकुश आरेकर, वि. दा. पिंगळे व अनिल साबळे हे कवी सहभागी होते.

सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनासाठी डॉ. आंबेडकरांनी सम्पूर्ण आयुष्य समर्पित केले. पाच हजार वर्षांपासून असलेली जातीयता विषमतेला मोठे खिंडार पाडण्याचे काम डॉ. आंबेडकर यांनी केले. त्यांना परिवर्तनाच्या शब्दांनीच अभिवादन केले जावे यासाठी मसापच्या वतीने 'परिवर्तनाच्या कविता' हा कार्यक्रम आयोजित केला होता. पुणे शहर प्रतिनिधी अरविंद संगमनेरकर उपस्थित होते. कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र थोरात यांनी सूत्रसंचालन केले.