'मसाप' तर्फे ६ मेला विनोद-साहित्य-आनंद मेळ्याचे आयोजन


पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि लायन्स क्लब औंध-पाषाण यांच्या सयुंक्त विद्यमाने जागतिक हास्यदिनाच्या निमित्ताने विनोद-साहित्य- आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार ६ मे रोजी सायं. ५. ३० ते ८ या वेळेत एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि लायन्स क्लब औंध-पाषाणचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांचे 'विनोदाची गंभीर वाट' या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्रसिद्ध कथाकथनकार रवींद्र कोकरे यांच्या विनोदी कथाकथनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश शहा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत असे प्रा. जोशी आणि डॉ. सतीश देसाई यांनी कळविले आहे.
