मसाप ब्लॉग  

वाचकांचा कौल

May 18, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेने यंदा प्रथमच त्यांच्या तर्फे देण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारासाठी वाचकांचा सहभाग घेतला. त्यात १००७ वाचकांनी सहभाग घेतला. ३५ वाचकांनी पत्रे पाठवून तर ९७२ वाचकांनी मेलद्वारे आपल्या आपल्या आवडीची पुस्तके कळविली. त्याचे सर्वेक्षण करून मसापने वाचकांच्या अभिप्रायाचा कल अजमावण्याचा प्रयन्त केला आहे. १०% वाचकांनी ललित साहित्याची (कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णने) आवडती पुस्तके कळविली. २१ % वाचकांनी चरित्र / आत्मचरित्र या प्रकारातील पुस्तके कळविली. ४०% वाचकांनी माहितीपर पुस्तकांची नावे पुरस्कारांसाठी कळविली. २८% वाचकांनी वैचारिक साहित्यातली आवडती पुस्तके कळविली. १% वाचकांनी समीक्षेसंदर्भातली आवडती पुस्तके कळविली. यावरून वाचकांच्या दृष्टीने माहितीपर पुस्तकांना प्रथमस्थान, वैचारिक साहित्याला द्वितीय स्थान, चरित्र, आत्मचरित्र प्रकरातील पुस्तकांना  तिसरे स्थान, ललित साहित्याला चौथे स्थान आणि समीक्षेला शेवटचे स्थान देण्यात आले आहे. असा निष्कर्ष समोर आल्याचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts