'मसाप गप्पा' मध्ये डॉ. माधव गाडगीळ यांच्याबरोबर गप्पा
पुणे : आपल्या सोप्या आणि सहजसुंदर शैलीतून विज्ञान विषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ महाराष्ट्र्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी पर्यावरण अभ्यासक डॉ. वर्षा गजेंद्रगडकर संवाद साधणार आहेत. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.
