'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात आश्लेषा महाजन आणि मीरा शिंदे साधणार विद्यार्थ्यांशी संव

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन आणि मीरा शिंदे सहभागी होणार आहेत. कर्वे रोड वरील सेंट क्रिस्पिन्स होम कन्या शाळेतील विद्यार्थिनींशी त्या संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्याध्यापिका माधवी सॅम्युअल, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. ३० जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक माधव राजगुरू यांनी दिली.