मसाप ब्लॉग  

भाषेची गंमत कळण्यासाठी भाषेशी खेळायला शिका : डॉ. न. म. जोशी

July 29, 2018

 

मसाप तर्फे अक्षरयात्री पुरस्कार प्रदान

 

 

 

पुणे : 'केवळ पाठयपुस्तकांचा अभ्यास करून मराठीत चांगले गुण मिळाले म्हणून भाषा समजत नाही. भाषेची गंमत करण्यासाठी भाषेशी खेळायला शिका भाषेचा क्रीडा व्यवहार वाढला पाहिजे असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले. माध्यमिक शालान्त परीक्षेत मराठी विषयात प्रथम व द्वितीय आलेल्या ऐश्वर्या म्हस्के आणि योगिता मगर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अक्षरयात्री पुरस्कार प्रदान करताना ते बोलत होते. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, अक्षरयात्री संस्थेच्या अध्यक्षा संजीवनी बोकील उपस्थित होते.

डॉ. न. म. जोशी म्हणाले, 'सगळे जगबदलत चालले आहे. अशा काळात मातृभाषेबद्दल गोडी निर्माण करणे, तिच्याशी खेळणे महत्वाचे आहे. मराठीचा शिक्षक हा मराठी भाषेचा संवर्धक आहे. त्याच्या कल्पना, समस्या यांचा विचार केला पाहिजे. 
प्रा. जोशी म्हणाले, 'शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. भाषेत मुलांना रस निर्माण होईल असे अध्यापन कौशल्य त्यांनी आत्मसात केले पाहिजे. त्यांनी स्वतः अवांतर वाचन केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनाही वाचनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. मुलांमधल्या लेखन गुणाला प्रोत्साहन दिले पाहिजे केवळ परीक्षेसाठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास न करता जीवन समृद्ध करण्यासाठी तो केला पाहिजे. अशी मानसिकता तयार केली पाहिजे. संजीवनी बोकील यांनीही आपले विचार व्यक्त केले.  यावेळी योगिता मगर व ऐश्वर्या म्हस्के या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया केळवकर आभार मानले.

 

 

 

 

 

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018