महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. विलास शंकर रानडे पुरस्कार जाहीर
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या वतीने, दरवर्षी क्रीडा/वैद्यकविषयक उत्कृष्ट ग्रंथाला डॉ. शकुंतला क्षीरसागर पुरस्कृत, मानाचा असा कै. विलास शंकर रानडे स्मृतिपुरस्कार दिला जातो. यावर्षीच्या पुरस्करासाठी, डॉ. यशवंत तोरो (सांगली), लिखित 'कॅन्सर -निदान, उपचार व प्रतिबंध' या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. डॉ. मनोज देशपांडे आणि पत्रकार अमोल मचा
ले यांच्या निवड समितीने या ग्रंथाची निवड केली आहे. रु. ५०००/- आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार समारंभ, शुक्रवार दिनांक १० ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात, डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते होणार आहे. प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.
